प्रतिष्ठा न्यूज
सांगली : अजमेर येथील लव ऑल टेनिस अकॅडमी येथे झालेल्या १२ वर्षांखालील अखिल भारतीय चैम्पियनशिप सिरीज ७ लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीच्या भार्गवी पवन भोसले हिने मुलीच्या एकेरीच्या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. अखिल भारतीय लॉन टेनिस एसोसिएशन आणि राजस्थान स्टेट लॉन टेनिस एसोसिएशन यांच्या आयोजनाखाली ही चॅम्पियनशिप सिरीज ७ स्पर्धा अजमेर येथे २१-२४ सप्टेंबर रोजी पार पडली.
सांगलीची युवा टेनिस खेळाडू भार्गवी भोसले हिने स्पर्धेतील एकेरी गटात उपांत्य सामन्यात जोरदार खेळाचे प्रदर्शन करीत अत्यंत संघर्षपूर्ण लढतीत धाडसी खेळ करत शांभवी सिंग (म.प्रदेश) हिचा ६-३, ७-५ असा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम लढतीत भार्गवी हिने दिवेना धुपर (म. प्रदेश) हिच्या विरुद्ध पहिला सेटमध्ये १-४ पिछाडी भरून काढत टायब्रेक ला पहिला सेट थोडक्यात गमवावा लागला. अंतिम लढतीत भार्गवी हिचा ६-७(९),३-६ असा पराभव झाला. १० वर्षाच्या भार्गवी च्या या कामगिरीबद्दल सांगली टेनिस खेळाडू आणि मान्यवर कौतुक होत आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण लव ऑल टेनिस अकॅडमी स्पर्धा संचालक रितू तंवर, अक्षांश ठाकूर आणि स्पर्धा निरीक्षक फतेह सिंग यांचे उपस्थित पार पडले. सांगलीची युवा टेनिसपटू भार्गवी भोसले ही विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल येथे शिकत आहे. ती आमराई ऑफिसर्स क्लब येथे श्रेया पै टेनिस अकॅडमीची खेळाडू असून तिला प्रशिक्षक रविंद्र कदम आणि सोनू तोडू आणि दत्ता पै, तसेच निलेश बाबर याचे मार्गदर्शन लाभले. तसेच तिला एस.बी. ग्रुपचे गजानन भोसले यांचे मोलाचे आर्थिक पाठबळ मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या