सांगली प्रतिनिधी : जायंटस सप्ताह २०२६ निमित्त जायंटस ग्रुप ऑफ सांगलीतर्फे नवजीवन प्रशाला, रामनगर येथील विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या सप्ताहात १०० मीटर धावणे, वाचन, हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धा, दंत व आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आदी उपक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन मिळाले. सप्ताहातील विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमासाठी केंद्रीय समिती सदस्य ॲड. विलासराव पवार, फेडरेशन २ क अध्यक्षा श्रीमती अनुजाताई पाटील, युनिट डायरेक्टर गुंडूराव वसवाडे, ग्रुपचे अध्यक्ष नितेश पवार, डॉ. अनिल पाटील, दिगंबर टिकारे, जायंटस ग्रुप सर्व पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक कदम सर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांसाठी प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीतून राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने जायंटस ग्रुप ऑफ सांगलीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या