प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगरपरिषदेची विशेष सभा सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता नगरपरिषदेच्या सर्कससिंह परशुराम माळी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगराध्यक्षा सौ.विजया बाबासो पाटील यांच्या सहीने नगरपरिषद सदस्यांना या सभेची नोटीस बजावण्यात आली आहे.
उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान व सदस्यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही विशेष सभा बोलावण्यात आली आहे. तासगाव शहरातील स्वर्गीय आर.आर. (आबा) पाटील यांच्या पुतळ्यासमोर असलेले दारूचे दुकान त्वरित बंद करण्यात यावे अथवा तेथून स्थलांतरित करण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनावर विचार-विनिमय करून अंतिम निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ८१ (४) (क) नुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.या सभेत या विषयावर काय निर्णय होतो,याकडे तासगाव वासीयांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या