सांगली, दि. १६ : शहरातील खड्डे, कचरा, अतिक्रमण, अनधिकृत होर्डिंग्जपासून ते कचरा संकलन वाहनांच्या Tracking पर्यंतच्या नागरी समस्यांवर आता तरुणांच्या कल्पकतेतून डिजिटल उपाय शोधले जाणार आहेत. सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘SMKC Civic Innovation Forum 2026’ आयोजित करण्यात आले आहे.
सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिका आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियानांतर्गत ‘SMKC Civic Innovation Forum 2026’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रत्यक्ष नागरी समस्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी विद्यार्थी, युवा तंत्रज्ञ तसेच IT, Software आणि Technology क्षेत्रातील व्यावसायिकांना या उपक्रमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी १६ सप्टेंबरपासून नोंदणीला सुरुवात झाली असून २८ सप्टेंबर २०२६ ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.
शहरातील दैनंदिन नागरी सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून समस्या ओळखणे, त्यावर कार्यवाही करणे, कार्यवाहीचा मागोवा घेणे आणि नागरिकांना पारदर्शक माहिती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी विविध नागरी प्रश्नांवर Software किंवा Application आधारित डिजिटल उपाय विकसित करण्यासाठी सहभागी टीमना संधी दिली जाणार आहे.
या उपक्रमात Smart Pothole Detection, Resolution & Escalation, Smart GVP Detection, Clean-up & Littering Enforcement, Geo-tagged Photo-based Attendance & Field Presence, Garbage Collection Vehicle Tracking & Citizen Service View तसेच Illegal Hoarding Detection & Digital Encroachment Management या पाच प्रमुख Challenge Tracks वर काम करता येणार आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांची स्मार्ट पद्धतीने ओळख व दुरुस्तीचा मागोवा, कचरा साचणाऱ्या ठिकाणांची ओळख व स्वच्छता व्यवस्थापन, मैदानी कर्मचाऱ्यांची Geo-tagged Photo आधारित उपस्थिती, कचरा संकलन वाहनांचे Tracking आणि नागरिकांना सेवेची माहिती देणे, तसेच अनधिकृत होर्डिंग्ज व अतिक्रमणांचे डिजिटल व्यवस्थापन अशा विषयांवर सहभागी टीमना नाविन्यपूर्ण उपाय विकसित करता येणार आहेत.
या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा तंत्रज्ञ, IT Professionals, Software Developers आणि Technology Professionals सहभागी होऊ शकतात. सहभाग टीमच्या स्वरूपात असून प्रत्येक टीममध्ये किमान दोन आणि कमाल चार सदस्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक टीमसाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये आहे.
उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या Ideas आणि Proposals मधून Technical Committee मार्फत १५ टीमची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक टीमला प्रमाणपत्रासह ५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या टीमकडून त्यांच्या निवडलेल्या Challenge Track वर प्रत्यक्ष Software किंवा Application विकसित करून घेण्यात येणार आहे. अंतिम मूल्यमापनानंतर पाच उत्कृष्ट Software Projects निवडले जाणार असून प्रत्येक विजेत्या प्रकल्पाला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उपक्रमातून विकसित होणाऱ्या उत्कृष्ट आणि व्यवहार्य तंत्रज्ञान उपायांचा पुढील वापर व अंमलबजावणी करण्याबाबतही विचार करण्यात येणार आहे.
‘Green Thinking, Smart Technology आणि Citizen Participation’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सांगली–मिरज–कुपवाड शहरातील नागरी व्यवस्थापन अधिक स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी तरुणांच्या कल्पना व तंत्रज्ञानाची सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
नागरी समस्यांवर नाविन्यपूर्ण डिजिटल उपाय सुचवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी, युवा तंत्रज्ञ आणि IT/Software/Technology क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या