प्रतिष्ठा न्यूज
मिरज : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्ल्ड स्पेस डे मोठ्या उत्साहात आणि विज्ञानप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल कुतूहल, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनासाठी डी.एड. कॉलेजच्या मुख्याध्यापिका क्रिस्टीना मार्टिन ,स्टेट बोर्ड च्या मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या निमित्ताने शाळेच्या परिसरात आकर्षक स्पेस थीम सजावट करण्यात आली. अंतराळवीर, ग्रह, तारे, आकाशगंगा आणि अवकाश संशोधन यांवर आधारित माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शिक्षकांनी भारताच्या अंतराळ संशोधनातील यशस्वी वाटचाल, इस्रोच्या महत्त्वपूर्ण मोहिमा तसेच अंतराळ संशोधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी अवकाशाशी संबंधित प्रश्नोत्तरे, चर्चासत्रे आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण होऊन भविष्यामध्ये संशोधन क्षेत्राकडे प्रेरित होण्याची भावना दृढ झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या या मुख्याध्यापिका रूपाली हार्डी ,प्रशासक रफिक तांबोळी, उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर ,समन्वयिका अश्विनी येळकर या सर्वांनी या प्रदर्शना साठी प्रोत्साहन दिले. त्याशिवाय सायन्स डिपार्टमेंटच्या एच. ओ. डी.शितल कुरणे आणि शाफाक शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सर्व प्रदर्शनाचे नियोजन केले होते. शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. "आजचे जिज्ञासू विद्यार्थी हेच उद्याचे शास्त्रज्ञ" हा संदेश देत वर्ल्ड स्पेस डेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सर्व प्रदर्शन पाहताना शाळेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त ऍडव्होकेट वीरेंद्र पाटील समन्वयक सतीश पाटील यांचा अभिमानाने उर भरून आला त्यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. आपल्या शाळेतून असे देशासाठी वैज्ञानिक तयार होताना पाहून त्यांना विद्यार्थ्यांचा अभिमान वाटला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या