प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्हास्तरीय शालेय ॲथलेटिक्स स्पर्धेत स्वराज्य फाउंडेशन व पी.जी. स्पोर्ट्स, तासगावच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लयलूट केली. विविध क्रीडा प्रकारांत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत खेळाडूंनी तासगावच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढवला. या यशाच्या जोरावर चार खेळाडूंची २८ व २९ ऑक्टोबर रोजी डेरवण (जि. रत्नागिरी) येथे होणाऱ्या शालेय विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेत समरजित शिंत्रे याने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ४०० मीटर धावण्यात प्रथम, तर २०० मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक पटकावला.वर्षा माने हिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात १०० मीटर हर्डल्स आणि लांब उडी या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. याच वयोगटात वैष्णवी माने हिने तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तर १९ वर्षांखालील मुलींच्या गटात आकांक्षा गायकवाड हिने हातोडा फेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.चारही खेळाडूंनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित मानले जात आहे. आता विभागीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्यासाठी हे खेळाडू सज्ज झाले आहेत.
*मार्गदर्शकांच्या प्रयत्नांना यश*
या खेळाडूंना क्रीडा अधिकारी सीमा पाटील, प्रशिक्षक पवन घोडके, सांगली पोलीस स्वप्निल जाधव, स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष किरण माने, संचालक गुंडू थोरबोले, अभिजित कोळेकर, सचिन सूर्यवंशी, सिद्ध सर, राष्ट्रीय खेळाडू पांडुरंग थोरबोले आणि शहाजी खरमाटे यांचे मार्गदर्शन लाभले.खेळाडूंच्या या यशाबद्दल स्वराज्य फाउंडेशन व पी.जी. स्पोर्ट्स, तासगाव यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आगामी विभागीय स्पर्धेतही खेळाडूंनी यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या