प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरज येथील विद्यार्थिनी पोर्णिमा कदम हिने शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
स्पर्धेत पोर्णिमाने अचूक नेमबाजी, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे खाडे स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
पोर्णिमाच्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच क्रीडा विभागाच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. पोर्णिमाच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या