प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : येथील श्री शिवाजी महाराज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उल्लेखनीय आर्थिक प्रगती नोंदवत ₹1.09 कोटींचा नफा मिळविला आहे. सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष शंकर कणसे यांनी ही माहिती दिली.
शहरातील कलिदास शिक्षण संस्थेच्या प्रारांगण येथे संस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना शंकर कनसे म्हणाले की, संस्थेने वर्षानुवर्षे आर्थिक प्रगती साधली असून सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेचा विस्तार होत आहे. सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास संस्थेचे प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोसायटीचे संचालक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ सदाशिव पवार यांनी सांगितले की,
सन 2025-26 या आर्थिक वर्षात संस्थेने विविध आर्थिक व्यवहारांमध्ये चांगली कामगिरी केली. संस्थेच्या ठेवी, कर्जवाटप तसेच इतर आर्थिक बाबींमध्ये समाधानकारक वाढ झाली असल्याचे सांगितले.
सोसायटीचे उपाध्यक्ष संजय जबुंरे यांनी वार्षिक अहवाल मांडताना सांगितले की, सोसायटीचे 5117 सदस्य असून, 3 कोटी 40 लाख शेयर भांडवल, ₹74.65 कोटींच्या ठेवी, ₹4.02 कोटी , तसेच ₹5.24 कोटींचे इतर निधी असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेचा एकूण व्यवसायही ₹87.32 कोटींवर पोहोचला आहे. सभासदांना यंदा ₹17.70 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून, ₹15.38 कोटींची कर्जवसुली झाल्याचेही सांगण्यात आले.
संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळ, कर्मचारी आणि सभासदांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. यावेळी संस्थेच्या विविध योजनांचा व आगामी आर्थिक वर्षातील उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
व्यासपीठावर संचालक मंडळाचे सदस्य बाबूराव तरसे, प्रविण बोडके , रामचंद्र चव्हाण, सरोजिनी निक्कम, अंबुताई जाधव, सुरेखा कदम, रवि मदभावी, भारत देवकुळे, पांडुरंग रोहिटे, मुख्य व्यवस्थापक संजय जाधव,व्यवस्थापक चंद्रकांत जाधव, अंबादास चव्हाण, उपस्थित होते तर विठ्ठल चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर रामचंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
याच कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या नामदेव मारुती गौडा, आनंद कुभांर, मंजुळा हिप्परगी, अभिषेक धनवडे, जयश्री भारते यांच्या सत्कार करण्यात आले तर 101 विद्यार्थ्यांना प्रतिभा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या