प्रतिष्ठा न्यूज
पुणे, दि. २२ : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक पुणे येथे उत्साहात पार पडली. भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश प्रभारी मिलिंदजी तुळसकर आणि प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील कामगार संघटन बळकटीकरण, कामगारांचे विविध प्रश्न तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कामगार मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच कामगारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्यावर भर देण्यात आला. संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजना व सवलतींची माहिती मिळावी आणि त्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष अविनाश मोहिते तसेच सांगली शहर जिल्हा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय वसंत मोरे यांनी सांगली जिल्ह्यातील असंघटित कामगार आणि बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे बैठकीचे लक्ष वेधले. कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना येणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या विविध मागण्यांबाबतही चर्चा करण्यात आली.
संघटन विस्तारावर भर
पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार मोर्चाचे नेटवर्क अधिक मजबूत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कामगारांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या समजून घेणे, शासनाच्या योजनांची माहिती देणे आणि संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणे, यावर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
असंघटित कामगारांसाठी पाठपुरावा
बांधकाम कामगार, फेरीवाले, घरेलू कामगार तसेच इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या विविध योजना, सवलती व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे बैठकीत सांगण्यात आले.
या बैठकीस सांगली शहर जिल्ह्यातून समाधान लोंढे, संजय वसंत मोरे, नंदकुमार पिंजारी, किरण चव्हाण, प्रकाश आवटी, राजू मद्रासी, बसवेश्वर औंधे, अमोल पाटील, राजेंद्र कांबळे, आबा हसबे, राजेंद्र सूर्यवंशी, मनोहर जाधव, राजेंद्र पवार, प्रकाश कांबळे, सुनील आवळे, प्रकाश हवाळ, अभिजीत घोलप, बंडू पेटरगी यांच्यासह भाजपा कामगार मोर्चाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या