प्रतिष्ठा न्यूज
डाफळापूर प्रतिनिधी : शैक्षणिक गुणवत्ता व शाळेचा दर्जा उंचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बनवणारी शाळा व्यवस्थापन समिती असते. शासनाने सांगितलेल्या नियमानुसार जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्रचना व पुनर्गठन करण्यात आले. यावेळी यासाठी सर्व पालकांचे सहकार्य लाभले व सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
या बैठकीमध्ये सखोल विचार करून शाळा व्यवस्थापन समितीची पुनरचना करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी बाबासाहेब कोंडीकीरे उपाध्यक्ष संतोष शिवाजी धूलगुडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती शिंगणापूर सदस्य धनाजी मूरग्याप्पा हजारे, आण्णासो दादासो पांढरे, महादेव दादासो कोंडीकीरे, सुरेश केचप्पा नाटेकर, जयश्री अमोल कोंडिकीरे, सुषमा दिलीप देसाई, सखुबाई बाबुराव देसाई, हुसेनबी दस्तगीर मुल्ला, जयश्री संजय कांबळे, गंगुबाई निवृत्ती पांढरे यांची निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अजितराव सखाराम पांढरे ,विठ्ठल मारुती कोंडिकिरे - शिक्षणतज्ञ व शिक्षक प्रतिनिधी म्हणून अविनाश माधवराव काळे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा शाळा व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध सचिव भाऊसो राजाराम चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, नवनीत सदस्य यांनी शाळेला सहकार्य करण्याचे व विविध प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले.
शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे शाळेचा कणा असून त्यासाठी उच्चशिक्षित सर्व नवनीत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांची निवड झाल्यामुळे पालक पालक वर्गातून भरभरून कौतुक केले जात आहे.
ग्रामपंचायत शिंगणापूर व गावातील तरुण मंडळ, विविध सामाजिक ग्रुप यांच्याकडून नवीन निवड झालेल्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या