प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय शेतकरी द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रमात चेअरमन विजय कुंभार लिखित ‘बेदाणा शेतीचा मूलमंत्र’ या पुस्तकासह द्राक्ष बाग व्यवस्थापन मार्गदर्शक चार्टचे प्रकाशन करण्यात आले. जिजामाता मंगल कार्यालयात १२ व १३ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रशिक्षणात छाटणीपासून माल काढणीपर्यंतचे नियोजन, जीएचा वापर, निर्यातक्षम उत्पादन, घडगळ व कुज नियंत्रण, विरळणी आणि कॅनोपी व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रकाशन सोहळ्यास डॉ. प्रा. राहुल शेळके, संचालक धोंडीराम झांबरे, प्रगतशील बागायतदार रणजीत शिंदे सर, युसूफ शेख, वैभव कुलकर्णी, सचिन मोहिते, किरण पाटील, राहुल पाटील व शिवाजी आबा मोहिते यांच्यासह मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी करून दर्जेदार द्राक्ष व बेदाणा उत्पादन घेण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन देणे हा प्रशिक्षणाचा उद्देश होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या