प्रतिष्ठा न्यूज
विटा : क्रांतिविरागना हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात अभिवादन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हौसाताई पाटील यांच्या स्मृती जागविण्यासाठी हा आगळावेगळा साहित्यिक उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे.
क्रांतिविरागना हौसाताई पाटील यांच्या कार्यावर आणि विचारांवर प्रेम करणारे प्रख्यात साहित्यिक व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर तसेच अहमदपूर येथील माय मराठी वृत्तवाहिनीचे निर्माते-संपादक व ज्येष्ठ कवी राजेसाहेब कदम हे आपल्या साहित्यिक मित्रांसह या कविसंमेलनास उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांसोबतच परिसरातील साहित्यिक व कवी रघुराज मेटकरी, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सुभाष कवडे, सुधीर इनामदार, सुनील दबडे, एम. डी. जमादार, अशोक पवार तसेच कवयित्री वृषाली कुलकर्णी यांच्यासह अनेक कवी व साहित्यिक या अभिवादन कविसंमेलनात सहभागी होणार आहेत.
हौसाताई पाटील यांच्या स्मृतींना काव्याच्या माध्यमातून अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या कार्याची आणि विचारांची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. विविध साहित्यिकांच्या कविता, विडंबन, काव्यवाचन आणि साहित्यिक अभिव्यक्तींमधून हा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.
दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ, विटा येथे होणाऱ्या या अभिवादन कविसंमेलनास साहित्यप्रेमी, काव्यरसिक आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या