विजयपूर : जेडीएसच्या विजयपूर शहर घटकाच्या अध्यक्ष व विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत जेडीएस कार्यालयात बैठक पार पडली. शहर अध्यक्षांच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून डॉ. सी. एस. सोलापूर व मुत्तुराज जंगमशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते पंचप्पण्णा कलबुर्गी यांनी शहरातील सर्व वॉर्डांमध्ये पक्षाचे पदाधिकारी नियुक्त करून संघटना मजबूत करण्याची सूचना केली. जेडीएसचे राज्य उपाध्यक्ष अप्पुगौडा पाटील यांनी शहरात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शन केले.
महिला नेत्या अफसराबेगम चप्परबंद यांनी महिलांचा पक्ष संघटनेतील सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.
बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई देण्याबरोबरच कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तलावांमध्ये पाणी भरण्याची योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणीही करण्यात आली.
दरम्यान, प्रशांत कणगी यांची जेडीएस विजयपूर शहर घटकाच्या अध्यक्षपदी पुढेही कायम नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
यावेळी राजू हिप्परगी, खादर इनामदार, मल्लू तोरवी आदींनी पक्ष संघटनेबाबत विचार मांडले. राजू हिप्परगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर खादर इनामदार यांनी आभार मानले.
बैठकीस खादर पटेल, संजू हिरेमठ, वाजिद काजी, डॉ. प्रकाश हेरकल, डॉ. सिद्धनगौडा पाटील, संजू दोडमणी, डॉ. मल्लिकार्जुन शिरूर, शिवलिंग कणगी, बाबू शिरणगार, हुसेन बागायत यांच्यासह जेडीएसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या