सांगली प्रतिनिधी : सांगली- इस्लामपूर बायपास रोडवरील "इलाईट हिरो "या हिरो दु-चाकी कंपनीच्या अधिकृत विक्री व सेवा केंद्राचे उद्घाटन नांदणी येथील जैन मठाचे श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब पाटील, पारेख मेडिसेल्स प्रायव्हेट लिमिटेडचे पुणेचे श्री. महेश पारेख, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील ,फार्मेसी कौन्सिल ऑफ इंडिया सदस्य श्री. विजय पाटील , लिंगायत बोर्डिंग ,सांगली खजिनदार श्री विनायक शेटे,तसेच के डब्ल्यू सी कॉलेज,सांगली चेयरमैन श्री अजित सकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे विविध पदाधिकारी, औषध व्यवसायातील होलसेलर्स व रिटेलर्स, मित्रमंडळी, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इलाईट हिरोच्या माध्यमातून ग्राहकांना हिरो कंपनीची वाहने, विक्रीसह दर्जेदार सेवा व विक्रीनंतरची आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सांगली शहरासह परिसरातील ग्राहकांना विश्वासार्ह व समाधानकारक सेवा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना इलाईट हिरो चे संचालक श्री. विकास चौगुले म्हणाले, “औषध व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर आता वाहन व्यवसायातही त्याच विश्वासाच्या बळावर उत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. इलाईट हिरोच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम दर्जाची वाहने आणि विश्वासार्ह सेवा देऊन त्यांचे समाधान मिळवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
उपस्थित मान्यवरांनी श्री. विकास चौगुले यांच्या नव्या व्यवसाय उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. हिरो कंपनीच्या अधिकृत विक्री व सेवा केंद्रामुळे सांगली परिसरातील ग्राहकांना वाहन खरेदी तसेच सेवा सुविधांसाठी एक नवे विश्वासार्ह केंद्र उपलब्ध झाले आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या