मिरज : शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरजच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत तब्बल १० सुवर्णपदके आणि ६ रौप्यपदकांची कमाई केली. उत्कृष्ट कौशल्य, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
१९ वर्षांखालील गटात यश निर्मळे, पार्थ वाटकर, श्रेणिक चव्हाण, ऑल्विन भोरे, अदिब शाक्रीमसलत आणि युवराज ठोंबरे यांनी सुवर्णपदक पटकावले. अहमदअली मुल्ला आणि सोहम सुंगारे यांनी रौप्यपदक मिळविले.
१७ वर्षांखालील गटात युवराज माळी याने सुवर्णपदक पटकावले, तर समर्थ ओंकार आणि रोनित साळुंखे यांनी रौप्यपदक मिळविले.
१४ वर्षांखालील गटात युसूफ मुल्ला आणि हर्ष रेळकर यांनी सुवर्णपदक पटकावले, तर युवराज चोकाके याने रौप्यपदक मिळविले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, क्रीडा विभाग, शिक्षकवृंद आणि पालकवर्गाने पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे खाडे स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या