सांगली प्रतिनिधी : सांगली येथील दिग्विजय व्यायाम शाळा येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 17 वर्षांखालील गटात 44 किलो वजनगटात श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलच्या अर्पिता राजू हजारी इयत्ता 9 वी. हिने एकूण 80 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकावला तीची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच 17 वर्षाखालील वयोगटात 56 किलो वजनगटात इयत्ता दहावीच्या साईराज प्रकाश भोरे याने एकूण 106 किलो वजन उचलून द्वितीय क्रमांक पटकावला.
दोघांना क्रीडा शिक्षिका रुकसाना मुलाणी रमेश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे न्यू सांगली एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतिनाथ कांते उपाध्यक्ष मिलिंद खिलारे संचालक प्रा राजेंद्र मेंच,संचालक राजकुमार हेरले मुख्याध्यापिका सौ संध्या गोंधळेकर पर्यवेक्षिका सौ वैशाली कणिरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या