सांगली प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज, सांगली यांचे वतीने नवीन शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे बदललेल्या अभ्यासक्रमावरील कार्यशाळा गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी संपन्न झाली सदरची कार्यशाळा IKS,VEC, SEC,VSEC, OJT,FP,RP या विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित होती. सदरची कार्यशाळा शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांकरिता आयोजित करण्यात आली होती.एकूण तीन सत्रामध्ये ही कार्यक्रशाळा संपन्न झाली. उद्घाटन सत्राच्या समारंभामध्ये प्रो.(डॉ.)एम.एस. देशमुख, अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित होते.त्यांनी या कार्यशाळेमध्ये बीजभाषण केले. नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी, त्याबाबतची विद्यापीठाची भूमिका आणि धोरण स्पष्ट केले.या धोरणानुसार राबविण्यात येत असलेल्या क्रेडिट सिस्टीम, मल्टीडीसीप्लिनरी सिस्टीम याद्वारे विद्यार्थीकेंद्री शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत असलेबाबत सांगितले. या सत्राचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ. आर. व्ही. कुपवाडे यांनी भूषविले.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात साधन व्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे (पलूस) यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा समृद्ध वारसा सांगितला. या ज्ञानपरंपरेचा आणि अभ्यासक्रमाचा जोडलेला अनुबंध स्पष्ट केला. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्रो. डॉ. विकास मिणचेकर यांचे क्षेत्रीय प्रकल्प आणि प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन केले जाणारे संशोधन याबाबतचे स्वरूप आणि कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन केले. सदर सत्रात प्रा. डॉ.यशवंत चव्हाण , मराठी विभाग प्रमुख, सहकारभूषण डॉ. एस. के. पाटील महाविद्यालय , कुरुंदवाड हे अध्यक्षस्थानी होते.सत्र चौथे मध्ये प्रा. डॉ. मनोहर कोरे, विलिंग्डन कॉलेज, सांगली हे साधन व्यक्ती म्हणून लाभले. त्यांनी आपल्या व्याख्यानात मूल्याधारित , कौशल्याधारीत शिक्षणावर मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.पी. एन. चौगुले, डॉ. पी. एन. गोरे, उपप्राचार्य यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. महाविद्यालयातील सर्व स्टाफ, आणि विद्यार्थी यांचे देखील या कार्यशाळेच्या संयोजनाकरीता मदत झाली.
श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज येथे नवीन अभ्यासक्रमावरील कार्यशाळा संपन्न
By -
सप्टेंबर २४, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या