प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ही काळाची गरज असून, स्वयंसेवकांनी आपत्तीच्या प्रसंगी मदतीसाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश एस. पाटील होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समन्वयक रफीक नदाफ यांनी आपत्तीच्या काळात तत्काळ प्रतिसादाचे महत्त्व स्पष्ट केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश कुमार यांनी आपत्तीचे प्रकार, बचावकार्य, प्रथमोपचार व घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.एन.डी.आर.एफ. पथकाच्या वतीने भूकंप, सीपीआर, आग, रक्तस्त्राव थांबविणे, पूर तसेच आपत्कालीन स्ट्रेचर तयार करण्याबाबत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रकाश क्षीरसागर, राहुल धाडस, महेश साळुंखे, श्याम फाफले, मनोज वाघमले, दत्तात्रय मगर व नानासाहेब माने यांनी सहभाग घेतला.
यावेळी डॉ. दत्तात्रय थोडबोले, डॉ. दत्ता गुंजाळ, प्रा. जितेंद्र लावंड, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. साईनाथ घोगरे, डॉ. पूनम पाटील, प्रा. नेहा मोरे, प्रा. पल्लवी मिरजकर यांच्यासह शिक्षक, स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. तातोबा बदामे, सूत्रसंचालन प्रा. सविता कोळेकर, तर आभार डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या