प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगाव : कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आज तासगाव बंदची हाक देण्यात आली.या बंदला तासगाव शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली.हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई करून जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. आरोपीस कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार आणि शिवसैनिक उपस्थित होतें.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या