प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगर परिषदेच्या निकाला नंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या गटनेत्यांची आज अधिकृत निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)गटनेते पदी नगरसेविका सौ.सुशीला संजय जाधव यांची निवड झाली आहे.त्यांच्या निवडीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.सौ.सुशीला संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्याचप्रमाणे माजी खासदार संजय काका पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि स्वाभिमानी विकास आघाडीच्या गटनेते पदी नूतन नगरसेवक सतीश लिंबळे यांची करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे स्वाभिमानी विकास आघाडीला नगर परिषदेमध्ये सक्षम नेतृत्व मिळाले आहे.सतीश लिंबळे हे सामाजिक कार्यात सक्रिय असून नागरिकांशी थेट संवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.शहराच्या पाणीपुरवठा,रस्ते,स्वच्छता तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ते प्रभावीपणे आवाज उठवून कामं करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दोन्ही गटनेत्यांच्या निवडीबद्दल पक्ष पदाधिकारी,नगरसेवक व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले असून तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील,माजी आमदार सुमनताई पाटील,युवानेते प्रभाकर पाटील,तासगावच्या नूतन नगराध्यक्ष सौ विजया पाटील व सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर एकत्रित येऊन फोटोसेशन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या