प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगाव : लोकशाही मध्ये प्रसार माध्यमांना चौथा आधार स्तंभ मानला जातो. सध्याच्या बदलत्या सामाजिक, राजकीय जीवन प्रवाहात माध्यमांची भूमिका निर्णायक ठरत आहे. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे. असे प्रतिपादन तासगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा विजया पाटील यांनी केले. तासगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मिडिया यांच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अतुल पाटोळे होते. यावेळी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरूदेव काबुगडे, दीपक पाटील, डॉ. साहिल जमदाडे व उमेश गायकवाड उपस्थित होते.
नगराध्यक्षा विजया पाटील म्हणाल्या, पत्रकारितेच्या या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून समाज प्रबोधनाचे काम करतात बिघडलेला समाज घडवण्याचे व त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचे काम करतात.त्यामुळे आता फक्त प्रसार माध्यमेच जनतेला आश्वासक वाटतं आहेत. आम्ही हाती घेतलेल्या अभ्यासाचा भोंगा या उपक्रमातून शहरातील विद्यार्थ्यांना नक्कीच चांगली सवय लागणार आहे. विविध कामांच्या माध्यमातून आम्ही तासगावचा विकास करू असे सांगत लोकप्रतिनिधीच्या नजरेतून चुकणाऱ्या गोष्टी दाखवून देण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार अतुल पाटोळे यांनी आपल्या भाषणात "सध्या माध्यमांमधे अनेक बदलती आव्हाने आहेत. समाजाच्या उणिवा दूर करन्याचे काम पत्रकार करतात. समाजात नकारात्मकता वाढत आहे. पण समाजाला सकारात्मकता निर्माण करण्याची चोख भूमिका पत्रकारांनी पार पाडावी. निकोप समाज व बळकट लोकशाही करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. सोशल मीडिया प्रचंड वाढला आहे. यामुळे वृत्तपत्रे वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आजही वृत्तपत्र ही बातम्यांची विश्वासार्हता ठरवण्याचे प्रमाण मानले जाते. त्यामुळे वृत्तपत्र ही कधीच बंद होणार नाहीत. पुढे ते म्हणाले, माणसाचे जीवन अधिक धकाधकीचे बनले आहे. अनेकदा पत्रकारांना विविध कामानिमित्ताने घरापासून दूर रहावे लागते. सुरक्षेच्या दृष्टीने पत्रकारांना विमा पॉलिसी गरजेची आहे. ही बाब लक्षात घेऊन तासगाव तालुका पत्रकार संघ पुढाकार घेऊन तालुक्यातील पत्रकारांना विमा पॉलिसीचे वाटप करतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे. असे गौरव उदगार काढले.
भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी तासगाव तालुक्यात राजकारण्यांना फक्त पत्रकारांचे भीती असून राजकीय मंडळींना उभा करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. असे त्यांनी सांगितले सामाजिक सुधारण्याचा हेतू सोबत वृत्तपत्रांचे समाजातील योगदान मोठे असून ती विश्वासार्हता फक्त त्यांनी जपली आहे. पत्रकार भवन व हौसिंग सोसायटी हा त्यांचा प्रश्न असून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही त्यासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.
माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राजकीय नेते व चुकीचे काम करणाऱ्या वर कंट्रोल ठेवण्याचे काम पत्रकार करत असल्याचे सांगत तुमच्या अडचणी असतील त्यावर मार्ग काढू, तसेच तासगाव नगर परिषदेच्या माध्यमातून तासगाव तालुका पत्रकार संघासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार हा समाजाचा प्रतिबिंब आहे अन्यायग्रस्तांना त्यांची मदत व त्यांची ताकद म्हणून ते काम करतात एखादे सरकार उलथवण्याची धमक त्यांच्यात आहे चांगली वाईट दोन्ही बाजू बांधून एखाद्याला ग्राउंड वर नेण्याचे, प्रशासनाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि प्रशासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची भूमिका प्रसार माध्यमे करत त्यांनी असल्याचे सांगितले.
यावेळी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंना तीन वर्षाची अपघाती विमा संरक्षण पॉलिसी व जॅकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी पत्रकार संजय पाटील, तानाजीराव जाधव, चंदू शिकलगार, उत्तम जानकर, दिलीप जाधव, मिलिंद पोळ, प्रशांत सावंत, मारुती कोष्टी, गजानन पाटील, हंबीरराव पाटील, विनायक कदम, अशोक जमदाडे, रमेश मस्के, प्रशांत चव्हाण, गजानन खेराडकर, अजय जाधव, उल्हास सूर्यवंशी, अमोल तुंगे, आबासाहेब चव्हाण, अमोल माने, योगिता माने, किरण देवकुळे, किरण कुंभार, संतोष एडके, अजित माने, निलेश काळबागे आदी पत्रकार उपस्थित होते. स्वागत संकेत पाटील यांनी, प्रास्ताविक अध्यक्ष विष्णू जमदाडे केले तर सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष संजय माळी केले. आभार सचिव प्रदीप पोतदार यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या