प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील तासगाव पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आर्थिक देवाण घेवाणीवरून शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या हाणामारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे असून,याप्रकरणी उपअभियंता मधुमती कुलकर्णी यांनी संबंधित शाखा अभियंता ए.के. बारवकर यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.यामुळे पंचायत समितीत अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आर्थिक वादातून शाखा अभियंता बारवकर आणि एका ठेकेदारात हाणामारीचा प्रकार घडला होता.या प्रकाराने बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.बांधकाम विभागाच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने प्रकार दडपण्याचे प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून सुरू असल्याची चर्चा होती.मात्र गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन उपअभियंता
कुलकर्णी यांना तातडीने कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.सोमवारी उपअभियंता कुलकर्णी यांनी शाखा अभियंता बारवकर यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून बारवकर यांना बजावलेल्या नोटीसित म्हटले आहे की,शासकीय कार्यालयात झालेली घटना प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसून ही घटना कार्यालयाची प्रतिमा मलिन करणारी आहे.तरी आपणावर जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई का करण्यात येऊ नये,याचा खुलासा सदर नोटीस मिळालेपासून तात्काळ (७२ तासाचे आत) कार्यालयाकडे सादर करावा.खुलासा मुदतीत अथवा समाधानकारक प्राप्त न झाल्यास सूचित केलेप्रमाणे कारवाई करण्यात येईल.शासकीय कार्यालयात शाखा अभियंता आणि ठेकेदार यांच्यात हाणामारीची घटना होण्याचा पहिलाच प्रसंग घडला असल्याने या याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या