प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा निमित्ताने जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे मंगळवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून अभिजीत काकासो माने साहेब लेफ्टनंट कर्नल ऑफिसर हेडक्वार्टर डेहराडून हे लाभले होते.
ते स्वतः नवोदय चे विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी नवोदय शिष्यवृत्ती व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कसे भरघोस यश संपादन केले त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना पालकांना मार्गदर्शन केले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाल्यामुळे जिल्हा परिषद शाळेत ते कसे घडले व त्यांनी कशी मेहनत करून यश संपादन केले त्याचा मंत्र विद्यार्थ्यांना दिला. मुख्य मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना यशाची चतुःसूत्री सांगितली त्याप्रमाणे मेहनत केली तर जीवनात प्रत्येक परीक्षेत तुम्हाला यश मिळेल याची हमी दिली.
मुख्य मार्गदर्शक यांचे वडील काकासो माने यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा हाच खरा यशाचा पाय आहे हे सर्वांना समजून दिले. त्यांच्या मुलाला त्यांनी कसं घडवलं आणि यशाच्या शिखरावर कसं पोहोचलो ते सर्व पालक विद्यार्थी यांना सांगितले.
या कार्यक्रमासाठी धनाजी हजारे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेला मदत केली.
जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अण्णासो पांढरे व सदस्य यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेला मदत केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे सर यांनी केले व यासाठी मुख्याध्यापक चव्हाण सर , नखाते सर ,चौरे सर सपकाळ सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले व कार्यक्रम यशस्वी केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या