प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तासगाव तालुका क्रीडा स्पर्धा 2025-26 नुकत्याच पार पडल्या. प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा हातनुरच्या विद्यार्थ्यांची लहान गट मुले रिले व कबड्डी,गोळा फेक,मुली रिले 50 मीटर व 100 मीटर धावणे,मोठा गट मुले लांब उडी या क्रिडा प्रकारात जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड, सांगली डायटचे प्राचार्य विकास सलगर,वरिष्ठ अधिव्याख्याता सुरेश माने,रेणुका जाधव, स्पर्धा विभाग प्रमुख सुलभा पुजारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी ज्योती पुरोहित यांनी "पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे तो और भी लाजवाब" या काव्यपंक्ती उधृत करत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला,तसेच शालेय,सहशालेय उपक्रमातून अधिकारी बनण्याची प्रेरणा मुलांना दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी शाळेतून केंद्रस्तरावर,केंद्रस्तरावरून तालुका स्तरावर व तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी जाऊन तेथून शिल्ड किंवा पदकासह घरी परत येतात.त्यांना पुढे कुठेही सहजासहजी संधी मिळत नसल्याचे सांगितले.
शिक्षक,कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या स्पर्धांच्या धरतीवर गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील अनवाणी धावणाऱ्या व खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्पर्धेनंतर विभागीय,राज्यस्तरावर व त्यानंतर देशपातळीवर,आशियाई गेम्स व ऑलिंपिक मध्ये संधी मिळाल्यास देशाची पदकांची संख्या वाढेल,ही बाब शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे व शिक्षणमंत्री यांनी याबाबतीमध्ये विचारपूर्वक योग्य निर्णय घेऊ,असे आश्वासन दिल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी शंकर पवार,चव्हाण,बी आर सी विषय तज्ञ वैभव आंबी,वैभव बंडगर,आशिष भंडारे,नितीन रास्ते,अमोल कोळेकर,मनोज आवटी,वर्षा जाधव,सुरेखा राऊत,धनश्री माळी,मीनाक्षी शितोळे,स्वाती देवांग,पुनम जाधव यांनी तालुका स्तरावर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या.
मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक विकास शेळके,तालुका समन्वयक धनंजय पाटील,दयानंद घाडगे,नलिनी हजारे,सुप्रिया वन्ने,इमरान शेख यांनी जिल्हा परिषद हातनूरचे मार्गदर्शक शिक्षक वसंतराव पाटील, कलावती कदम,जोत्स्ना पाटील, शशिकांत पाटील,नीता सावंत, सलीम मुलाणी, यास्मिन वलांडकर, सलमा मुल्ला, दीपक बोबडे,शशिकला पाटील, स्वाती पाटील,पल्लवी भोसले व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
प्रभारी व कार्यरत केंद्रप्रमुख अमोल केंगार,अण्णासाहेब गायकवाड,वंदना कदम,जयश्री पाटील,उत्कला सागरे,मुनाफ नदाफ,रवी खरमाटे,तानाजी चव्हाण,उदय रकटे यांनी तालुका क्रीडा स्पर्धांचे संयोजन केले
सांगली जिल्ह्यासाठी तासगाव तालुक्यातून खो खो लहान गट नेहरूनगर,कबड्डी लहान गट मुली नागाव कवठे,खो-खो विसापूर,रिले मोठा गट मुली विसापूर दोन,कबड्डी वासुंबे,खो-खो विसापूर दोन, व वैयक्तिक गटातून 24 विद्यार्थी विद्यार्थिनी अजिंक्यपदासाठी जिल्ह्यातून खेळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या