तासगाव : येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून शाखा अभियंत्याने ठेकेदाराला मारहाण केल्याची रंगतदार चर्चा पंचायत समिती परिसरात सुरु आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी याची कसून चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.याबाबत अधीक माहिती अशी कि,संबंधित शाखा अभियंता हा काही ठेकेदार आणि त्याच्याकडे असणाऱ्या मजूर सोसायटीच्या माध्यमातून बांधकाम विभागाकडील कामे स्वतः करीत असल्याचा आरोप ठेकेदार आणि काही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला होता.याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाचे उपअभियंता यांना वादग्रस्त शाखा अभियंत्याकडे असणाऱ्या विशिष्ट गावाची असणारी जबाबदारी काढून घेऊन अन्य नवीन गावे देण्यात यावीत,अशा सूचना दिल्या होत्या.मात्र राजकीय दबाव आणून संबंधित शाखा अभियंता त्याच्या विभागाकडील कामे स्वतःच्या मालकीच्या यंत्रणेद्वारेच करीत असल्याची चर्चा आहे.संबंधित अभियंता आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक देवाण-घेवाणीतून अनेक वेळा खटके उडाले होते.हा वाद आरे-तुरेवर गेला.त्यातूनच एकमेकांची कॉलर पकडून कानाखाली आवाज काढून हाणामारी पर्यंत प्रकरण गेल्याची चर्चा आहे.
आर्थिक देवाण घेवानीतून तासगाव पंचायत समितीत हाणामारी? पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
By -
जानेवारी ०२, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या