प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
गगनबावडा : नववर्षाच्या स्वागतासाठी प्रति महाबळेश्वर गगनबावडा पूर्णतः सज्ज झाला असून थंडीची चाहूल लागताच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गरम्य वातावरण, धुक्याची चादर, हिरवीगार डोंगररांग आणि आल्हाददायक हवामानामुळे गगनबावडा हे नववर्ष साजरे करण्यासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर येथील हॉटेल्स, रिसॉर्ट्स, होमस्टे तसेच पर्यटन व्यावसायिकांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसर सुशोभित करण्यात आला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनही सतर्क आहे. वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
थंडीचा जोर वाढत असला तरी निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. विशेषतः कुटुंबांसह येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. स्थानिक व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होत असून, नववर्षामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी गगनबावडा सज्ज असून, आनंद, उत्साह आणि सुरक्षिततेच्या वातावरणात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी तालुका सज्ज झाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या