प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘गगनबावडा प्रीमियर लीग नाईट अंडरआर्म क्रिकेट पर्व – 2025’ ने क्रिकेटप्रेमींना अक्षरशः वेड लावले. 19, 20 व 21 डिसेंबर 2025 रोजी रुपणेवाडी येथील क्रीडांगणावर पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण तालुक्यातील आठ संघ व तब्बल 90 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या अंतिम सामन्यात रानवारा फायटर्स सांगशी संघाने सिराज इलेव्हन लखमापूर संघावर मात करत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला ₹15,000 रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी, तर उपविजेत्या संघाला ₹10,000 व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
उत्तेजनार्थ पारितोषिके – रासाई स्पोर्ट्स असळज व ऐश्वर्या स्पोर्ट्स भुतलवाडी यांना प्रत्येकी ₹5,000 व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
वैयक्तिक पुरस्कार
फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच : शरद पवार (रानवारा फायटर्स)
मॅन ऑफ द सिरीज : सिराज इलेव्हन लखमापूर
उत्कृष्ट गोलंदाज : तुषार
उत्कृष्ट फलंदाज : अक्षय पडवळ (रानवारा फायटर्स सांगशी)
पंच व संयोजन
पंच : संतोष चव्हाण, विवेक घाडगे
संयोजक : संतोष चव्हाण, अविनाश बांडागळे, सिराज मुल्लानी, आकाश प्रभू, शेखर व समीर कुडाळ
या स्पर्धेचे उद्घाटन पंत अमात्य जहागीरदार यांचे वारस निलराजे पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील, तसेच सर्व संघचालक उपस्थित होते. विशेष आकर्षण म्हणजे युट्युबवर थेट (लाईव्ह) प्रक्षेपण, ज्यामुळे तालुक्याबाहेरील प्रेक्षकांनाही सामन्यांचा आनंद घेता आला.
सुरुवातीला स्पर्धेचे आयोजन सांगशी येथे करण्यात आले होते; मात्र नंतर ते असळज येथे स्थलांतरित करण्यात आले. ग्रामीण भागात अशा भव्य स्पर्धेचे आयोजन करणे आव्हानात्मक असतानाही आयोजकांनी उत्तम नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन करत सर्व सामने पूर्ण शांततेत व उत्साहात पार पाडले.
गगनबावडा तालुक्याच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय जोडणाऱ्या या नाईट क्रिकेट पर्वाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील वर्षी आणखी मोठ्या स्वरूपात आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या