प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : नारी आरोग्य, सन्मान व सुरक्षित भविष्यासाठी प्राणवायू ग्रुपतर्फे प्रख्यात तज्ञ डॉ. अजित पाटील यांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन उज्वला चौधरी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात महिला कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त झाल्या आहेत की त्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे महिलांना विविध गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. अजित पाटील यांनी आपल्या व्याख्यानात केले.
महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या प्राणवायू ग्रुपचे तसेच या उपक्रमाच्या आयोजक उज्वला चौधरी यांचे कौतुक भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. पाटील यांच्या मताशी सहमती दर्शवत महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करावी व स्वतःच्या तब्येतीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास शेखर इनामदार, मंजीरीताई गाडगीळ, माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, योगिता ताई राठोड यांच्यासह शर्वरी सोलापुरे , अर्चना मुळे, ज्योती किणीकर, सुप्रिया शेट्टी, भाग्यश्री परमाज, महादेवी एरंडोले , नंदा गायकवाड, सविता अडगळे, प्रिया कोरोचे, सुनीता सूर्यवंशी, सुशीला पाटील, त्रिशला साजणे , आदिती पाटील, संगीता मुळे, शर्मिला चौगुले, लता सकळे आदी संस्थेचे सभासद उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या