प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगाव: सलग दोन वेळा झालेला पराभव कोणत्याही लढवय्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी असतो.असा पराभव मनोबल खच्ची करू शकतो, आत्मविश्वास ढासळवू शकतो.मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की पराभव त्यांना संपवत नाही,तर अधिक मजबूत बनवतो.प्रभाकर बाबांच्या बाबतीतही नेमकं तेच घडलं.अपयशाने खचून न जाता, त्यांनी राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केला.फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेऊन आकाशाला गवसणी घालण्याची हीच खरी वेळ आहे,हे त्यांनी ओळखले.याच निर्णायक काळात नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली.ही निवडणूक केवळ सत्तेसाठीची नव्हती,तर अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची होती.संजय काकांचे राजकीय बळ पुन्हा एकदा जनतेसमोर ठामपणे मांडण्याची, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्याची आणि मायबाप जनतेचा विश्वास जिंकण्याची ही लढाई होती.या कठीण प्रसंगी प्रभाकर बाबांनी अक्षरशः जिवाचे रान केले.या निवडणुकीत ना अधिकृत पक्षाचा पाठिंबा होता,ना निवडणूक चिन्हाचा आधार.सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा प्रभाकर बाबा डगमगले नाहीत.उलट त्यांनी संघर्षाला कवटाळले.महाभारतात अर्जुनासाठी शत्रूंनी रचलेला चक्रव्यूह भेदण्यासाठी अभिमन्यू उतरतो, त्याचप्रमाणे संजय काकांसाठी विरोधकांनी आखलेल्या राजकीय चक्रव्यूहाला भेदण्यासाठी प्रभाकर बाबा दंड थोपटून मैदानात उतरले.
महाभारतात अभिमन्यू अंतिम क्षणी चक्रव्यूहात अडकतो,पण प्रभाकर बाबा मात्र अडकले नाहीत.त्यांनी शांतपणे,संयमाने आणि अचूक रणनीतीने विरोधकांचे चक्रव्यूह अंतिम टप्प्यात पद्धतशीरपणे भेदले. एवढेच नाही तर त्यांनी मिळवलेला विजय इतका ठसठशीत होता की विरोधकांना भविष्यात कोणताही राजकीय डाव टाकताना हजार वेळा विचार करावा लागेल.कारण हा केवळ विजय नव्हता,तर विरोधकांना दिलेली ठोस चपराक होती.नगरपालिकेची ही निवडणूक म्हणजे एका मोठ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आहे.येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत संजय काकांच्या या छाव्याचा जलवा विरोधकांना पाहावा लागणार आहे.ग्राउंड लेव्हलवर राहून,सामान्य जनतेत मिसळून,लोकांचे प्रश्न समजून घेत काम करणारे प्रभाकर बाबा आज एक विश्वासार्ह आणि उदयोन्मुख नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
पराभवातून शिकवण घेत या वेळी प्रभाकर बाबांनी आपल्या राजकीय चालींमध्ये मोठे बदल केले.नवे डावपेच आखले,वेगळी रणनीती रचली आणि आधुनिक पद्धतीने निवडणूक लढवली.त्याचा परिणाम असा झाला की या तरुण,तडफदार नेतृत्वाने केवळ मतेच नाही,तर जनतेची मनेही जिंकली.त्यामुळे संजय काकांना साथ देणारे आधुनिक पिढीतील नेतृत्व म्हणून प्रभाकर बाबांची राजकारणात ठळक छाप पडू लागली आहे.सलग दोन पराभव स्वीकारूनही पुन्हा उभे राहण्याची जिद्द,कार्यकर्त्यांचे मनोबल उभे करण्याची ताकद आणि जनतेच्या राजकारणासाठी झटण्याची तयारी प्रभाकर बाबांनी दाखवून दिली आहे. आजचा निकाल स्पष्टपणे सांगतो की प्रभाकर बाबा राजकारणाचा एक नवा पॅटर्न तयार करत आहेत. ते आपल्या पित्यासाठी केवळ वारस नसून,एक भक्कम ढाल बनले आहेत.शांत डोक्याने,अचूक चाल खेळणारा हा छावा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या चाणाक्ष राजकीय बुद्धीची झलक विरोधकांना दाखवत राहील.राजकारणाच्या पटावरील संजय काकांचा हा हुकमी वजीर प्रत्येक चालीत यशस्वी होत विजयश्री खेचत राहील आणि स्थानिक राजकारणाचा पट निश्चितच बदलून टाकेल,यात तिळमात्र शंका नाही.जनतेच्या राजकारणासाठी अहोरात्र झटणाऱ्या किंगमेकर प्रभाकर बाबांना या विजयाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
*शुभेच्छुक : प्रभाकर बाबा पाटील युवाशक्ती*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या