प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणारा ‘दर्द-ए-डिस्को’ हा विचारप्रवर्तक, रंजक आणि धाडसी नाट्यप्रयोग येत्या रविवार, १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता तासगावातील साने गुरुजी नाट्यगृह, जोगी गल्ली येथे सादर होणार आहे.समाजात अनेकदा कुजबुज, गैरसमज किंवा मौनाच्या पडद्याआड राहणाऱ्या ‘लैंगिक विषमता’ या संवेदनशील विषयाला केंद्रस्थानी ठेवून हे नाटक उभे करण्यात आले आहे.बदलती मूल्यव्यवस्था, माणसामाणसांतील संवादाचा अभाव आणि सामाजिक दुटप्पीपणा यावर नेमके प्रश्न उपस्थित करत हे नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे ठरणार आहे.कोल्हापूरचे नाट्यलेखक विद्यासागर अध्यापक यांनी या नाटकाचे प्रभावी लेखन केले असून, दिग्दर्शिका सौ. चेतना वैद्य यांनी आधुनिक रंगभाषेची सांगड घालत संवेदनशील आणि प्रभावी मांडणी केली आहे. नाटकात डॉ.अमर पागे, यशवंत कुलकर्णी, देवदत्त पेशकार, प्रशांत यादव, दिपाली कुलकर्णी, हर्षा बागल आणि भाग्यश्री पाटील यांसह कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
या नाट्यप्रयोगासाठी लोकमान्य टिळक वाचनालय (बामणोली), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सांगली उपनगर-२, अपंग सेवा केंद्र सांगली आणि आर्यरूप नाट्यसंस्था तासगाव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.विचारांना चालना देतानाच रसिकांचे भरभरून मनोरंजन करणारा हा नाट्यप्रयोग अनुभवण्यासाठी नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
"यातील दर्द अनुभवण्यासाठी... जगण्यातील डिस्कोवर थिरकण्यासाठी... नक्की या!" 🎭
*प्रवेशीका मिळण्याचे ठिकाण,* शीतल वस्त्रनिकेतन, व्हिजन कॉम्युटर,हरभोले कॅफे,अरिका बर्फी,अथर्व खरें, अमेय काळे तासगाव..
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या