सांगली: प्रोग्रेसीव चेस असोसिएशन, सांगली यांच्या वतीने रविवार, 14 जून 2026 रोजी तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल, विजयनगर, सांगली येथे 15 वर्षांखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा आणि खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम ₹25,000 असून आयोजन तक्षशीला इंटरनॅशनल स्कूल आणि केपीज चेस अकॅडेमी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या उपक्रमाला प्रोग्रेसीव चेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री चंद्रकांत वळवडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
15 वर्षांखालील स्पर्धा ही 1 जानेवारी 2011 नंतर जन्मलेल्या खेळाडूंसाठी असून या गटात एकूण 56 बक्षिसे, 15 ट्रॉफी आणि 27 पदके देण्यात येणार आहेत.
तर खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत 28 बक्षिसे, त्यापैकी 27 रोख बक्षिसे, तसेच 4 ट्रॉफी आणि 7 पदके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्व ट्रॉफी आणि पदके केपीज चेस अकॅडेमी तर्फे पुरस्कृत करण्यात आली आहेत.
ही एकदिवसीय स्पर्धा जलद बुद्धिबळ (Rapid Chess) प्रकारात स्विस सिस्टिमच्या 8 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार असून रिपोर्टिंगची वेळ सकाळी 9.30 वाजता आहे. प्रत्येक खेळाडूसाठी 10 मिनिटे + प्रत्येक चालीस 5 सेकंद अशी वेळ मर्यादा असेल.
स्पर्धेच्या मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच (International Arbiter) पौर्णिमा उपळावीकर आणि करण परीट काम पाहणार आहेत. तसेच शाहरुख कुरणे, नाझिया पटेल, पूजा धनवडे आणि अरुणा पुराणिक हे पंच म्हणून कार्यरत राहतील.
स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश स्वीकारला जाणार असून इच्छुक खेळाडूंनी नावनोंदणीसाठी श्री चंद्रकांत वळवडे ( +91 99759 59055 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या