प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नागाव कवठे (ता. तासगाव) येथील मंदिरातील चोरीच्या घटनेचा तासगाव पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व दोन मोटारसायकलींसह सुमारे 2 लाख 92 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे तालुक्यात कौतुकाची लाट उसळली आहे.दि. १८ मे रोजी सकाळी मंदिरातील देवांच्या मूर्तींवरील सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती.याबाबत सुरेश भिमराव पाटील (रा. नागाव कवठे) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी विशेष पथकाची स्थापना केली.सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीतील मुख्य आरोपी मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण (वय ३०, रा.बेळोडगी , ता. जत) येथे पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी प्रशांत हिम्मत शिंदे (वय ३०, रा. येळावी, ता. तासगाव), अरविंद राजू चव्हाण (वय २१, रा. सांडगेवाडी, ता. पलूस) आणि मच्छिंद्र श्रीशैल चव्हाण यांना अटक केली.आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे.
आरोपींकडून मंदिरातील चोरीस गेलेले चांदीचे फुले, चांदीचे छत्र, सोन्याचा मंगळसूत्रसह इतर दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली असा एकूण 2,92,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक विशाल टकले,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोहेकॉ.अमरसिंह सूर्यवंशी,सुरेश भोसले,संतोष माळी,सूरज जगदाळे, विवेक यादव,विठ्ठल सानप तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.तासगाव पोलिसांच्या तत्परतेमुळे मंदिर चोरीसारखा गंभीर गुन्हा अवघ्या चार तासांत उघडकीस आला असून नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या