प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.25 डिसेंबर : भारतरत्न, भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अटलजींच्या राष्ट्रनिष्ठेचा, दूरदृष्टीचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यात आला.
“सत्ता येते-जात असते, पण राष्ट्र प्रथम” हा मंत्र घेऊन अटलजींनी देशकारभार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली. त्यांचे विचार, कविता आणि राष्ट्रप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, माजी नगरसेवक संजय कुलकर्णी, मंडलध्यक्ष रविंद्र वादवणे, उद्योग आघाडीचे शरद नलवडे, कामगार आघाडीचे अविनाश मोहिते,कुणाल संकपाळ, उदय बेलवलकर, प्रशांत राठोड, अजिंक्य कुलकर्णी, जयवंत पाटील,भालचंद्र साठये, शुभम देसाई, गौस पठाण, राजू पठाण, सूरज कोळी, चंद्रकांत मालवणकर, भालचंद्र बक्षी,सर्व मंडल पदाधिकारी, यांच्यासह पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा आणि राष्ट्रसेवेचा संकल्प व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या