प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील क्राइस्ट असेंबली ट्रस्टच्या वतीने 25 डिसेंबर नाताळ या सणाचे औचित्य साधून ट्रस्टच्या माध्यमातून रस्त्यावर राहणाऱ्या निराधार लोकांना जेवण,स्वच्छ पिण्याचे पाणी व ब्लॅंकेट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपन्याच कामं करण्यात आले.नाताळ हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करत असताना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा आदर्श व भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे चालत आहे क्राईस्ट असेंबली ट्रस्ट अनेक वेळा सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असतात त्या पाठीमागचा उद्देश एकच आहे निराधार लोकांना आधार मिळावा त्यांचे आरोग्य निरोगी रहावे त्यांची प्रत्येक गरज या ट्रस्टच्या माध्यमातून भागवली जावी असा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी येणारा संपूर्ण खर्च पूर्णपणे लोक वर्गणीतूनच केला जातो. यावेळी ट्रस्टने तासगाव एसटी स्टॅन्ड, सांगली एसटी स्टॅन्ड,सांगली सिव्हिल हॉस्पिटल,मिरज एसटी स्टँड व मिरज रेल्वे स्टेशन या भागांमध्ये जाऊन उघड्यावर असणाऱ्या लोकांना वाटप केले आहे.या सामाजिक कार्यक्रमास महेंद्र चंडाळे सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख,क्राईस्ट असेंबली ट्रस्टचे अध्यक्ष मोजेस म्हेत्तर,उपाध्यक्ष मनीष कंदुला,सचिव आकाश गुंटगाणी, पापाराव म्हेत्तर,अतुल रणखांबे,सुधीर चव्हाण,अनोश म्हेत्तर,किरण म्हेत्तर, एज्रा कंदुला,शेखर म्हेत्तर,विष्णू म्हेत्तर,केतन म्हेत्तर,संतोष म्हेत्तर व सर्व महिला सभासद उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या