प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:आयुष्यमान भारत-महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना (AB-PMJAY/MJPJAY) अंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबास मोफत उपचारांसाठी वार्षिक 5 लाख आरोग्य विमा संरक्षण मिळते.आरोग्य विमा लाभ मिळविण्यासाठी राशन कार्ड आधार क्रमांकाशी लिंक करणे अत्यावश्यक आहे.आधार लिंक नसल्यास आयुष्यमान कार्ड तयार होणार नाही तसेच योजनेचे लाभ घेता येणार नसल्याचे तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले आहे.त्यांनी तासगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना अवाहन केले आहे की, आपले कोणतेही रेशन कार्ड कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांक संबंधित राशन कार्डाशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे,राशन कार्ड,सर्व कुटुंबीयांचे आधार कार्ड,मोबाईल नंबर (OTP साठी) आहेत.हे करण्यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वर Public Login सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या प्रणालीद्वारे सर्व प्रकारचे अर्ज नवीन,विभक्त,दुबार शिधापत्रिका, नाव/पत्ता बदल,सदस्य नाव वाढ/कमी व इतर दुरुस्त्या आता नागरिकांना स्वतःच्या मोबाइल किंवा संगणकावरून ऑनलाईन करता येतील.योजनेच्या लाभामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सर्व नागरिकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे अवाहन अतुल पाटोळे,तहसिलदार तासगाव यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या