प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित एमटीडीके शैक्षणिक संकुल मध्ये नाताळ सण अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. विद्यार्थ्यांनी सांताक्लॉज, देवदूत व विविध नाताळ सणाला साजेशी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली.
यावेळी नाताळ सणाचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी नाताळ गीतं, नृत्य, नाट्यछटा सादर करून प्रेम, शांतता व आनंदाचा संदेश दिला. सांताक्लॉजने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
शाळेच्या वतीने इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पाटील व सेमी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका करुणा माने यांनी विद्यार्थ्यांना नाताळच्या शुभेच्छा देत एकमेकांप्रती प्रेम, सद्भावना आणि आपुलकी जपण्याचा संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव, सर्जनशीलता व एकोप्याची भावना वृद्धिंगत होते, असे मत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा आ डॉ. सुरेश भाऊ खाडे संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या