प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : माजी आमदार सुमनताई पाटील यांच्या शिफारशीनुसार आणि आमदार रोहित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तासगाव तालुक्यातील चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दोन अशा सहा ठिकाणी ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्रे (सबस्टेशन) मंजूर करण्यात आली आहेत.तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी,व्यापारी आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे.निर्णयाबद्दल आमदार रोहित पाटील यांनी ऊर्जा विभागाचे आभार मानले आहेत.तासगाव तालुक्यातील कवठेएकंद,पाचवा मैल (निमनी),बस्तवडे,गोटेवाडी या चार ठिकाणी तर कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी आणि कोंगनोळी या दोन ठिकाणी नवीन ३३/११ के.व्ही.वीज उपकेंद्रे (सबस्टेशन) उभारण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या,शेतीसाठी लागणारी मुबलक वीज,उद्योग-व्यवसायांचा विस्तार तसेच घरगुती वापर लक्षात घेता या सबस्टेशनची आवश्यकता गेल्या अनेक वर्षांपासून होती. आमदार रोहित पाटील यांनी ही गरज ओळखून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता.कवठेएकंद सबस्टेशनचा लाभ कवठेएकंद, नागाव,मतकुणकी आणि वासुंबे गावांना होणार आहे.गोटेवाडी सबस्टेशनचा लाभ,गोटेवाडी, विसापूर,शिरगाव (वि),वंजारवाडी या गावांना होणार आहे.पाचवा मैल (निमणी) सबस्टेशनचा लाभ निमणी, नेहरूनगर,नागाव,लांडघोल मळा (तासगाव),तुरची या भागाला होणार आहे.तर बस्तवडे सबस्टेशनचा लाभ बस्तवडे,खुजगाव,सावळज (पश्चिम) या भागाला होणार आहे.कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी सब स्टेशनचा लाभ दुधेभावी,ढोलेवाडी,शिंदेवाडी, घोरपडी,विठ्ठलवाडी,कदमवाडी, निमज गावांना होणार आहे तर कोंगनोळी सबस्टेशनचा लाभ कोंगनोळी,सराटी,लोणारवाडी, चाबूकस्वारवाडी या गावांना होणार आहे.
चौकट : ग्रामीण भागाला विकासाची दिशा मिळणार,
याबाबत बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले,या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होणार असून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.तसेच ग्रामीण भागात नवीन उद्योग,कोल्ड स्टोरेज,प्रक्रिया उद्योग उभे राहण्यास संधी निर्माण होणार आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच डिजिटल सेवा, इंटरनेट सुविधा यांनाही चालना मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या