प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : येथील पोलीस पब्लिक समन्वय सेवा संस्था, सांगली यांच्या वतीने सामान्य कुटुंबातील कर्तव्यदक्ष व होतकरू मातांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन अमर पडळकर व वैशाली पडळकर यांनी केले होते.
सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत कुटुंबाची प्रगती साधणाऱ्या, मुलांवर उत्तम संस्कार घडवून त्यांना आदर्श नागरिक बनवणाऱ्या मातांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येतो. गेल्या दहा वर्षांपासून पडळकर दाम्पत्य अशा असामान्य कर्तृत्व गाजविणाऱ्या मातांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करत आहेत. यंदा सांगली परिसरातील सुमारे ११ मातांचा या समारंभात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंजिरीताई गाडगीळ, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे, माजी आमदार नितीन शिंदे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अश्रफ वांकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सत्कारमूर्तींमध्ये गौरबाई सनदी, विद्या बानकर, सुरुताई भोळे-पाटील, प्रभावती येसादे, राजश्री पुकाळे, शोभा माळी, संगीता आंबोळे, जयश्री मगदूम, गीता सुतार, उषा सागावकर, पारस्वती गुड्डी आदी मातांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित जगदाळे, शहाजी भोसले, राजू नलवडे, माजी नगरसेवक राजू गवळी, सुमित शिंदे, प्रदीप निकम, लियाकत शेख, समीर मोमीन, आरिफ शेख, वरद पडळकर, संस्कार पडळकर, संध्या पडळकर, सुरेखा औंधे, जयश्री मगदूम, यश मगदूम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या