प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.यावर्षी शनिवार शासकीय सुट्टीच्या दिवशी आल्याने मंगळवार दि. १८ रोजी कालगावकर मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तासगांव तहसिल कार्यालय आणि स्वावलंबी भारत अभियान सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने, तासगांव अर्बन बँकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्व लनाने झाली.स्वा. भा.अभियानचे जिल्हा समन्वयक आणि ग्राहक न्यालायातील मध्यस्त मिलींद सुतार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.यावेळी ते म्हणाले कि उदयोन्मुख उद्योजकांना बँकांनी कर्ज देताना त्यातील अडथळे दूर होण्याच्या दृष्टीने विचार करावा. म्हणून शहरातील सर्व बँकांचे शाखाधिकारी या कार्यक्रमासाठी बोलाविणेत आले आहे.तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रियांका माळी यांनी “शाश्वत जीवनशैलीसाठी योग्य बदल” या केंद्र सरकारने उत्सव विषय (थीम) निवडलेल्या विषयाची माहिती सांगितली.ग्राहक पंचायत महाराष्ट्र,विभागीय संघटक आलमशहा मोमीन यांनी जागतिक ग्राहक साजरा करण्यामागील इतिहास सांगितला.तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष एम.डी.पाटील यांनी ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीची उदाहरणे सांगितली.यावेळी प्रमुख वक्त्या आणि येथील सुप्रसिद्ध सी ए स्मिता पाटील यांनी बँकांनी नवउद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे प्रतिपादन केले.असाध्य रोगामुळे नोकरी सोडून शस्त्रक्रियेनंतर स्वतःची छोटी वडापावची टपरी सुरु करून अल्पावधीत यशस्वी झालेल्या शशिकांत माळी याचा सत्कार प्रा. एम.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी धनंजय मोहिते,किरण जाधव यांनी सुद्धा मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचा समारोप करताना मिलींद सुतार म्हणाले कि नवउद्योजकांचे व्यवस्थित प्रबोधन केल्यास कर्जाची परतफेड हि बँकांसाठी डोकेदुखी ठरणार नाही. त्यासाठी बँकांनी दर महिन्याला ग्राहक मेळावे घ्यावेत आणि कर्जदारांचे प्रबोधन करावे.या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व बँकांचे शाखाधिकारी आणि नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या