प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे (दादा) यांच्या जयंती महोत्सवास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज उत्साहात प्रारंभ झाला. या जयंती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याचवेळी संस्थेचे माजी मानद सचिव स्वर्गीय विजयराव श्रीपतराव बोंद्रे (बापू) यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले यांनी विजयराव बापूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या