प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : तासगाव नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील गटाने बाजी मारली, थेट नगराध्यक्षपदी या गटाच्या विजया बाबासाहेब पाटील या निवडून आल्या. त्यांना ९५४१ मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आमदार रोहित पाटील गटाच्या वासंती बाळासो सावंत यांना ९४४२ मते मिळाली. या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांना धक्का बसला आहे. तर सलग तिसऱ्यांदा पालिकेवर सत्ता मिळविली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर खासदार संजय पाटील यांनी तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कमबॅक केले आहे.
पालिकेच्या थेट नगराध्यक्षासह २५ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी ८८ उमेदवार रिंगणात होते. अर्ज भरताना डावलण्यात आल्याने आमदार रोहित पाटील गटात फुट पडली. या गटातील माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून आपल्या पत्नी ज्योती पाटील यांना उमेदवारी मिळवली. त्यामुळे त्यांची उमेदवार आमदार गटाला डोकेदुखी ठरली. दुसरीकडे माजी खासदार संजय पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली. त्यांनी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. तर आमदार गटाने माजी नगरसेवक बाळासो सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती. भाजपकडून विद्या चव्हाण - धाबुगडे तर शिवसेना उध्दव बाबासाहेब ठाकरे गटाकडून रंजना चव्हाण यांनी निवडणुक लढविली.
निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांच्या उपस्थितीत आज सकाळी ९.३० ला मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजण्यात आले. त्यामध्ये वासंती सावंत यांना ७, विजया पाटील यांना ३ तर ज्योती पाटील यांना १ मते मिळाली. पहिल्या फेरीत विजया पाटील यांना ३३३५ तर वासंती सावंत यांना ३३१८, विद्या चव्हाण यांना ५८१, ज्योती पाटील यांना ६८१ तर रंजना चव्हाण यांना १२८ मते मिळाली. या फेरीत विजया पाटील १७ मतांनी आघाडीवर राहिल्या.
मिळाली. तिसऱ्या फेरीत विजया पाटील दुसऱ्या फेरीत वासंती सावंत यांना ३३४९, विजया पाटील यांना ३०१७, ज्योती पाटील यांना ६९२, विद्या चव्हाण यांना ६२२, रंजना चव्हाण यांना १०७मते मिळाली. या फेरीत विजया पाटील पिछाडीवर पडल्या, तर वासंती सावंत यांना या फेरीत ३३२ मतांनी आघाडी
यांना ३१८६, वासंती सावंत यांना २७६८, ज्योती पाटील यांना ६१८, विद्या चव्हाण यांना ५६९ तर रंजना चव्हाण यांना १०६ मते मिळाली. या फेरीत विजया पाटील यांना ४१८ मतांचे मताधिक्य मिळाले. तिन्ही फेऱ्यांअखेर विद्या चव्हाण यांना १७७२, ज्योती पाटील यांना १९९२, विजया पाटील यांना ९५४१, रंजना चव्हाण यांना ३४१, बासंती सावंत यांना ९४४२ मते मिळाली.
विजया पाटील यांच्या विजयानंतर माजी खासदार संजय पाटील समर्थकांनी शहरात जल्लोष केला. गुलाल, फटाक्यांची आतषबाजी केली. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल पाटोळे यांनी विजया पाटील यांना प्रमाणपत्र दिले. पोलीस उपअधीक्षक अशोक भवड, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने खासदार संजयकाका पाटील यांनी कमबॅक केले असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी या निकालामुळे रंगत येणार आहे.
प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते
प्रभाग १ अ : मधुकर पाटील ८६५, सचिन पाटील ६७३, गजानन माळी ७२, प्रभाग १ ब : जयश्री कोकळे ७८२, स्वाती निकम ६५, निलम माळी ७५१
प्रभाग २ अ: अभिलाषा जावळे ७२०, रोहिणी धोत्रे ८०१, उषाबाई पवार ११९, संगिता माळी ७१, प्रभाग २ ब : राजेंद्र चव्हाण १३४, विकास धनवडे ९९, करण पवार ६९९, अरुण साळुंखे ७८८.
प्रभाग ३ अ नंदा चव्हाण २१७ पुनम माळी १०८८, रोहिणीताई शिरतोडे ६८३, प्रभाग ३ ब : बाजीराव काटकर ३८, प्रवीण जाधव ८२, अभिषेक देशिंगकर ११००, जाफर मुजावर ७७१. प्रभाग ४ अ: अनिल कुऱ्हाडे
७२६, सुशांत गायकवाड १३०, रामचंद्र माळी १०२४. प्रभाग ४ ब: शोभा जाधव १०१५, देवकी दर्गे १७०, स्नेहल पवार ६७१, दिपाली पुंडेकर २०.
प्रभाग ५ अ: अनिल कुत्ते ८८४, मारुती पवार ८५३, पवनकुमार शिंदे ९४, प्रमोद सावंत ३०. प्रभाग ५ ब : ज्योती कोळी ९०८, रेखा चव्हाण ९४, अश्विनी दरेकर ३३, अश्विनी माळी १०८, शुभांगी शिंदे ७१६.
प्रभाग ६ अ: अमृता माळी १३९१, अर्चना माळी १७५, माया रसाळ ४३९. प्रभाग ६ ब उमेश पेटकर ६३, अहमद मुजावर ११०८, आजम मुल्ला ७६, सद्दाम मोमीन ६५६, इरफान सय्यद ८१.
प्रभाग ७ अ: प्रसन्न गोसावी ७१, प्रवीण पाटील ४४, प्रसाद पैलवान ११८२, अमोल शिंदे ८४९. प्रभाग ७ब : शिल्पा खैरमोडे १३१, अश्विनी मोकळे ५४, प्रवीणा लुगडे ७३५, अर्चना शिंदे १२०६.
प्रभाग ८ अ : सुभाष आष्टेकर ८१, संतोष बेले ८२०, सुधीर माळी ८०७. प्रभाग ८ ब : सुशिला जाधव ८५३, उज्वला सावंत ७८६, माधुरी सावंत ७३
प्रभाग ९ अ: अनिल कोळी ९३१. सुरज गावडे २०७, सचिन भाट १२२१. प्रभाग ९ ब: भारती धाबुगडे १३३७, लिलावती धाबुगडे ८१८, कोमल पवार १३९, छाया पाटील ५९.
प्रभाग १० अ : बाबासाहेब कदम ९८३, दिनेश पवार १२०, विशाल पाटील १५१, सतिश लिंबळे ११०४. प्रभाग १० ख: अस्मिता पवार ३६५, सुरेखा बंडगर १८७, प्रतिभा लुगडे ६९९, संध्या लुगडे १०८९.
प्रभाग ११ अ: सचिन कांबळे ८१२, शिवाजी गुळवे ७५, प्रथमेश देवकुळे ७८१. प्रभाग ११ ब: आरती कांबळे ७२, सुनिता थोरात ४४९, दिपाली पाटील ११०२, शितल साळुंखे ५९.
प्रभाग १२ अ: अलकावती कांबळे १९२, उषा कांबळे ८६५, भारती कांबळे ६५३. प्रभाग १२ ब : रोहन कांबळे ८७२, सागर बाबर ८०, विशाल भोसले १२६, पोपट साळुंखे ६५४.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या