सांगली : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे दिनांक ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत सांगली जिल्हा युथ मुली संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या संघात चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी पूर्वा प्रशांत पोंक्षे (बी.कॉम भाग १) हिने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या उल्लेखनीय यशामुळे पूर्वा पोंक्षेची राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा दिनांक २४ ते २८ डिसेंबर दरम्यान झारखंड येथील रांची येथे होणार आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयात तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य नारायण आपटे, कार्यालयीन अधीक्षक संपदा शिंदे उपस्थित होते.
पूर्वा पोंक्षे हिला डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सांगली विभागीय अध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे, सदस्य रवींद्र ब्रम्हनाळकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. सचिन खेडकर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने व क्रीडा शिक्षक दत्तात्रय मुळुक यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनीच्या यशामुळे संस्थेच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा खोवला गेला असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या