प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिनाथ मंगल कार्यालय, मिरज, भाजपा कार्यालय, मिरज तसेच MTDK शैक्षणिक संकुल, मिरज येथे आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी अटलजींचा संघर्षमय जीवनप्रवास, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, राष्ट्रहितासाठी घेतलेले धाडसी निर्णय व देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान प्रभावीपणे मांडण्यात आले. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजसेवा, राष्ट्रभक्ती आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला.
अटलजींचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरक ठरला.
यावेळी सुमनताई खाडे, मंजिरीताई गाडगीळ, संगीता खोत, रसिकाताई खाडे आदि मान्यवर उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या