प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : बाजारात पावलोपावली ग्राहकाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने सावधगिरी पाळली पाहिजे असे प्रतिपादन मिलींद सुतार यांनी केले.तासगांव येथील संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे शिक्षणशास्त्र महाविद्यालया तील सभागृहात झालेल्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.यावेळी स्वा. विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ.बापुजी साळुंखे आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले.महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.अक्षदा शिरगांवकर हिने प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागील कारण विशद केले.प्रा.पी.एस.शेंडगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.लक्ष्मी भंडारे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यकर्माचे प्रमुख पाहुणे मिलींद सुतार म्हणाले कि १९८६ साली अस्तित्वात आलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल करून २०१९ साली नवा कायदा अंमलात आला.या कायद्याने ग्राहकाला मिळालेल्या हक्कांबाबत काहीच माहिती नसते.झालेल्या फसवणुकीबद्दल तक्रार कुठे करावी ? कशी करावी ? याबद्दल माहिती नसल्याने सामान्य ग्राहक तक्रार करत नाही.यासाठी अशा कार्यक्रमातून ग्राहकाचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुतार यांनी केले.ते पुढे म्हणाले कि बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा दर्जा,किंमत या गोष्टी तपासून आणि दिलेल्या रक्कमेची पावती घेणे अनिवार्य आहे. ग्राहक या शब्दाची कायद्याने केलेली व्याख्या आणि व्याप्ती खुप मोठी आहे.मिलींद सुतार यांनी यावेळी स्वावलंबी भारत अभियानाची सुद्धा माहिती सांगितली.तासगांव तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रियांका माळी यांनी शासकीय कामकाजात झालेल्या ऑनलाईन सुविधांची माहिती सांगितली.कु.स्वाती साळुंखे हिने आभार प्रदर्शन केले.सूत्रसंचालन कु. ऋषाली सूर्यवंशी आणि कु.सुमेधा सुतार यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या