तासगाव : तासगाव नगर पालिकेवर सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात माजी खासदार संजयकाका पाटील गट यशस्वी झाला आहे.आमदार रोहित पाटील गटाला धूळ चारून सत्तेत आलेल्या मा.खासदार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.विजया पाटील यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील, युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या सह निवडून आलेले सर्व नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पालिकेची निवडणूक चुरशीची झाली होती.माजी खासदार संजय काका पाटील व आमदार रोहित पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटात काट्याची टक्कर झाली होती.दोन्ही गटांनी पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद याचा वापर केला होता.लोकसभा आणि विधानसभेला पराभव झाल्याने संजय काका पाटील यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची झाली होती. तर आमदार रोहित पाटील यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची झाली होती. त्यामुळे दोन्ही गटांनी पालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते.
अखेर या अटीतटीच्या निवडणुकीत संजय काका पाटील गटाने बाजी मारली.या गटाचे नगराध्यक्ष व 13 नगरसेवक निवडून आले.तर रोहित पाटील गटाचे 11 नगरसेवक निवडून आले.या गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वासंती सावंत यांचा 99 मतांनी निसटता पराभव झाला.माजी खासदार गट सलग तिसऱ्यांदा पालिकेवर सत्ता मिळवण्यात यशस्वी झाला.पालिकेवर सत्ता मिळवल्यानंतर आज नगराध्यक्षा विजया पाटील यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसोबत पदभार स्वीकारला.तासगाव शहरातून वाजतगाजत फटाक्यांची आतिष बाजी करत,रॅली काढत त्यांनी पालिकेत 'एंट्री' केली.यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील,युवा नेते प्रभाकर पाटील,बाबासाहेब पाटील यांनी रॅलीदरम्यान तासगावकरांचे आभार मानले. पदभार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा विजया पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सर्वांना सोबत घेऊन माजी खासदार संजय काका यांच्या मार्गदर्शनाने कामं करू असे सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या