मिरज प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि कलात्मक अभिव्यक्ती विकसित करण्याच्या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल, बेडग या विद्यालयात फेस पेंटिंग हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी रंगांचा वापर कसा करावा, चेहऱ्यावरील भाव-भावना कशा प्रदर्शित कराव्यात,सौंदर्यदृष्टीचे ज्ञान कशा पद्धतीने विकसित करावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनात कलेविषयी आवड निर्माण व्हावी, रंगांबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि मुख्य म्हणजे स्व-अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळावे अशा उद्देशाने विद्यालयाचे मुख्याध्यापक अँथोनी डिसोझा ,पर्यवेक्षक एस. एस. दर्यावर्दी यांच्या मार्गदर्शनाखाली, कला आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ. सरिता माने-पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. उपशिक्षिका सायली कोरे तसेच क्रीडा शिक्षक रोहन सुंगारे यांनी देखील प्रात्यक्षिक करून दाखविले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुले, प्राणी, पक्षी, कार्टूनची पात्रे ,राष्ट्रीय चिन्हे, गणितीय संकल्पना इत्यादी विविध विषयांवर फेस पेंटिंग करण्यात आले. त्वचेसाठी सुरक्षित असणारे रंग, ब्रश, स्पॉन्स यांचा वापर करण्यात आला. शिक्षकांनी आधी योग्य सूचना दिल्या व प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वच विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेऊन रंगसंगती व कल्पनाशक्तीचा तसेच नाविन्यपूर्ण आकर्षक डिझाईनचा सुंदर अविष्कार घडवून आणला.
न्यू इंग्लिश स्कूल, बेडग मध्ये फेस पेंटिंग ॲक्टिव्हिटी
By -
डिसेंबर २६, २०२५
0
प्रतिष्ठा न्यूज
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या