निंबळक : भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषि महाविद्यालय कडेगाव मधील अंतिम वर्षाचे कृषि शाखेतील विद्यार्थी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगिक जोड याच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जीवन तसेच शेती, दुग्ध व्यवसाय, त्याच्यावर होणाऱ्या प्रक्रिया, ग्रामीण भागातील हवामान व त्याचा शेतीपूरक अभ्यास, मृदा परीक्षण, तसेच शेतीचे उत्पादन व बाजार मूल्य, कृषि औद्योगिक जोडधंदे,शेतीसाठी लागणारी खते व उपकरणे यांचा अभ्यास करणे, पुस्तकी ज्ञान बरोबर प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आंधळी येथे कृषी दुतांचे आगमन झाले आहे व सर्व ग्रामस्थयांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले येथे सहा महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व विषयांचा अभ्यास करतील. कृषि शाखेतील विद्यार्थी कृषिदूत हर्षद पाटील, प्रतिक पाटील, यश पवार, वृषभ माळी, विश्वजीत देवकर, युवराज तोडकर, नवीन खारगे, आनंद पाटील या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांना तथा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल. यांना मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए .डी. जाधव सर उपप्राचार्य डॉ.आर. एम .पवार रावे समन्वयक डॉ. चारुदत्त अवताडे सर, कार्यक्रम अधिकारी, प्रा.ए.एच.पाटील , प्रा.व्ही.एस शिंदे ,प्रा.एस.टी.माने सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. तसेच गावचे मा.सरपंच बबन लालासो पाटील,स्वप्निल जाधव,संदीप माने व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
आंधळी मध्ये कृषि दूतांचे आगमन
By -
डिसेंबर २६, २०२५
0
प्रतिष्ठा न्यूज / सौरभ निकम
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या