प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज :इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य शाखेच्या कृती समितीच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती IMA महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली.
डॉ. रियाज मुजावर हे आर्यन हार्ट केअर तसेच स्पंदन हृदयालय व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरजचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी हृदयरोग उपचार, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, रुग्णकेंद्री सेवा आणि सामाजिक आरोग्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे.
IMA महाराष्ट्र राज्य कृती समिती डॉक्टरांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे संरक्षण, आरोग्यविषयक धोरणांवर ठाम भूमिका आणि वैद्यकीय बांधवांमध्ये एकजूट निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते.
डॉ. मुजावर हे डॉक्टरांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांविरोधात अत्यंत आक्रमक व स्पष्ट भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत ते शून्य सहनशीलतेचा आग्रह धरतात. त्याचवेळी समाजातील सर्व घटकांसाठी परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबाबत ते ठामपणे सकारात्मक भूमिका घेत आहेत.
डॉ. मुजावर यांच्या नियुक्तीमुळे राज्यभरातील आरोग्यविषयक व धोरणात्मक मुद्द्यांवर प्रभावी नेतृत्व आणि ठोस भूमिका पाहायला मिळेल, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
“कृपया खालील लिंकवरील रिव्ह्यू सेक्शनमध्ये आमच्यासोबतचा तुमचा अनुभव लिहा.”
डॉ. रियाज उमर मुजावर
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या