तासगाव : सन १९८६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायद्याचा मसुदा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर केला.त्या मसुद्यावर २४ डिसेंबर १९८६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती मा. ग्यानी झैलसिंग यांनी स्वाक्षरी केली. म्हणून २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणे दि. २४/१२/२०२५ रोजी विटा येथील बळवंत महाविद्यालया तील संत गाडगेबाबा सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि कर्मवीर भाऊराव पाटील आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. राणी किर्दत यांनी प्रास्ताविक करताना या पावलोपावली फसविल्या जाणाऱ्या ग्राहकाचे प्रबोधन होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज विशद केली.श्रीमती आर.एच. चव्हाण यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते फुलझाडांची रोपं देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मिलींद सुतार म्हणाले कि १९८६ साली अस्तितात आलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र बदल करून २०१९ साली नवा कायदा अंमलात आला.त्या कायद्याने ग्राहकाला दिलेले सहा हक्क काय आहेत ? ते कसे वापरावेत ? ग्राहकाच्या फसवणुकीची उदाहरणं देवून फसवणूक कशी टाळता येईल याबद्दल सुतार यांनी विवेचन केले.ते पुढे म्हणाले कि बाजारात मिळणाऱ्या वस्तूंचा दर्जा, किंमत या गोष्टी तपासून घेणे आणि दिलेल्या रक्कमेची पावती घेणे ग्राहकासाठी अनिवार्य आहे.मिलींद सुतार यांनी स्वावलंबी भारत अभियानाची सुद्धा माहिती सांगितली.
प्रा.सुनिल जोशी यांनी सुद्धा ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल माहिती सांगितली.श्रीमती आर.एच.चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन आर.आर.बागल यांनी केले.या कार्यक्रमासाठी महा विद्यालयातील वाणिज्य शाखेचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या