प्रतिष्ठा न्यूज
सावळज प्रतिनिधी : सावळज ता. तासगाव येथील सेवानिवृत्त हवालदार अनिल शिवाजी निकम 12 मराठा लाईट इन्फंट्री यांचा सेवानिवृत्तीबद्दल सावळज ग्रामस्थाकडून व भारतीय माजी सैनिक संघटना, सावळज यांचे कडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
सेवानिवृत्त अनिल निकम यांनी आपल्या सैनिक सेवेची सुरुवात लेह लडाख येथून केली. त्यानंतर सिक्कीम, गुजरात, पंजाब या सह देशाच्या विविध प्रांतात भारतीय नागरिकांचे संरक्षणाची सेवा बजावली. त्यांनी तब्बल 24 वर्षे देशासाठी समर्पित केली. सेवानिवृत्तीनंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे व देशाचे कुलदैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती सांगली आणि सातारा जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे सत्कार कार्यक्रम घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ऑ.कॅप्टन अर्जुन लिंगळे हवालदार मारुती चव्हाण, सुभेदार मेजर अरविंद शिंदे, सुभेदार मेजर विष्णू जाधव तसेच आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच संजय दादा पाटील वडगाव, सरपंच मिलन पाटील, श्री. एम. एन. दादा चिवटे, माजी आमदार श्रीमती सुमन (ताई) आर.आर.पाटील, ताजुद्दीन तांबोळी, माजी जि प सदस्य वसंत (बापू ) सावंत सौ कल्पना (काकी) सावंत, सागर पाटील,अरुण पाटील,संजय तात्या थोरात ,श्री.सिद् गोंडा बापू पाटील, श्री प्रशांत कुलकर्णी, अविनाश काका पाटील,माजी नगराध्यक्ष, तासगाव डॉ. संदीप तारळेकर आणि डॉ. सौ. मेघा तारळेकर आणि संपूर्ण पवार खोरा व मळा आणि अशी
विविध सैनिक ,सामाजिक आणि राजकीय,क्षेत्रातील लोकांनी निकम परिवार वरती प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब जाधव सर (मुख्याध्यापक ,एस. के. इंग्लिश मीडियम स्कूल) आणि हवलदार अविनाश हंकारे ( सचिव भारतीय माजी सैनिक संघटना शाखा सावळज) यांनी केले आणि शेवटी आभार प्रदर्शन हवलदार रामचंद्र पाटील यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या